तू आहेस अजूनही ..
कुठेतरी शांत दडून
बसलेली ..
जेंव्हा घेतलेला प्रत्येक श्वास ...
तुझ्या नावाची दोर पकडून काळजा पर्यंत
जातो ...
तेंव्हा जाणवतेस तू ...
जेंव्हा नकळत डोळ्यात अश्रू निघून ..
गालावरून ओघळत
ओघळत ..
ओठांना स्पर्शतो ...
तेंव्हा जाणवतेस तू ..
पण खरतर तू नाही आहेस ...कि आहेस
?
असलीस तरी माझी नसणारच ..
नसलेलीच बरी ..
तुला माझी समजून ..
जखमी
आठवणींच्या पोटातल्या काही वेदना तरी कमी करू शकतो ..
तसही ...
सोड जाऊ दे ...
पण कधी
जर भावनांनी हद्द ती ओलांडली तर ?
No comments:
Post a Comment