Sunday, May 4, 2014

गोंधळ साल सर्व गोंधळ

हृदयाच्या या झाडावरती,
काही भावना (अधुर्या ,अपुर्या )
नांदत राहतात सुखाने ..
काही जुन्या जखमाच ,
नव्याने ठणकायला लागतात ..
जुन्या जखमांचा बहर आलाय जणू ....
आणि मग गार वारा सुटतो व्यथांचा ....

रात्री अपुर्नच राहिलेल्या इच्छा ,
पलंगावर लोळत राहतात ,

आणि आकाशाच्या पोटात,
मग भूक उगवते पहाटे पहाटे ,

रस्त्यात दु:ख धावतांना दिसते जिथे तिथे ,
माझ्या अनाथ जखमा ही निघतात ,,पळतात सैरा वैरा ...

चंद्र येतो आठवणींचा परत ...

रस्त्यावर धावणारे दु:ख निजवायचा प्रयत्न करतो ..पण ...

भूक साली संपत नाही ...

जागत राहते ..लोळत राहते ..रेंगाळत राहते ...

तो भुकेचा सूर्य ..आठवणींचा चंद्र.....

गोंधळ साल सर्व गोंधळ

नि:शब्द(देव)

No comments:

Post a Comment