Sunday, May 4, 2014

बाकी काही नाही ..5

हाताच्या रेषा पुसटसया झाल्या होत्या ..
असे नेहमी मला वाटायचे ...
विसरलो होतो ...तुझा हात माझ्या हाती आल्यावरच .
त्या रेषा पूर्ण होणार होत्या ..
आता त्याच रेषा नवीन आयुष्याच्या वाटा ठरवतील ..
तुझ्या कपाळावर नेहमी सजवशील तू मला ..
माझ्या नावाचे मंगळसूत्र आणि ..
तुझ्या नावा समोर माझे नाव ..
तुझे नाव बदलले ..तुझे घर बदलले ..
आणि माझ आयुष्य ..
ना माझे नाही ..आता आपले आयुष्य ...

एक धागा इतकाही मजबूत निघेल ..
जो आयुष्याचा पूर्ण गुंताच सोडवेल ..

कधी वाटले नव्हते ..
तुझ्या माझ्या आई वडिलांनी दिलेले आशीर्वाद ..
प्रत्येकाच्या सुखाचे प्रतिक बनून ..
आपल्यावर बरसलेल्या त्या अक्षदा ..
आणि सात सुरांनी सात रंगांनी ..सात रंगाचे ते सात फेरे ...

बरसलेली ती अक्षदा... ते आशीर्वाद ...त्या शुभेच्छा
ते मंत्र ...ते मंगळसूत्र ..तू ...
आणि मी ...

बाकी काही नाही ...

No comments:

Post a Comment