Sunday, May 4, 2014

बाकी काही नाही 2

धुमसणारा एकटेपणा ..
रात्र डोळ्यात उतरत ...
पापण्यांचा पदर लावतांना ...तू दिसलीस ....
त्या उतरणाऱ्या रात्रीतल्या चंद्रासारखी ....
नि सभोवताली लुकलुकणाऱ्या जखमा ...
डोळ्यातून हृदयात उतरणारा काळोख ...
आणि कुठेतरी त्या काळोखाशी झुंज देणारा एकटेपणा ..
धुमसणारा एकटेपणाच....
हलकीशी येणारी वार्याची झुळूक ..
माझ्या पर्यंत पोहाच्तांना मात्र वादळ बनून आलेली ...
सोबत काही सहानुभूतीच्या रिमझिम बरसणारया सरी....
आठवणींचा चिखल साचवत ...

जखमांच्या डबक्यात सुखांना बुचाकाळनाऱ्या ....
एक एक सुख त्यातून बाहेर काढतांना ...
व्यथांचा त्यावरचा चिखल निघता निघेना ...
त्यात ओठांवर खेळणारी शांतता, तुझ्या न येण्याची बातमी सांगत होती..
 गालावरून गळणाऱ्या त्या हरामखोर अश्रूंना ...

मी मात्र डोक्याच्या आणि हृदय्च्या खेळात ,
कोण जिंकणार हे पाहता पाहता ..

कधी मीच हारलो ते कळलेच नाही ....

रात्र एकटी येत नाही ग ....
हीच तर मोठी अडचण आहे ..
बाकी काही नाही ...

No comments:

Post a Comment