८ व्या मजल्याच्या
बालकणीमध्ये ...
शांती शोधायच्या निम्मिताने ..
पेल्यात जीवनाचा अंधार ओतून ...
कशी बशी बिल्डींग्स ला लढा देत ..
माझ्या जवळ पोहचणाऱ्या हवेशी गप्पा मारत बसलो आज ...
घराच्या आता असलेला पंखा फक्त श्रीमंती फेकतो ...
खाली बघितले तर तेच ..साला नुसत्या मागण्या धावतांना दिसतात ..
औकाद वाढवण्यासाठी ,औकाद सोडून धावणाऱ्या मागण्या ...
१५ जन ही मावणार नाही एवढे मोठे अन सुसज्ज गार्डन..
वाट पाहत असतो ..कि कधी ? कधी ?मल्हार ला त्याचे आजी आजोबा नाही ..
त्याचे आई वडील घेऊन येतील त्याच्या जवळ......
चार चाकात गुदमरलेली हवा कधी कधी येते त्याच्या दाराजवळ ..
आणि काळ्या काचेच्या आत मल्हार अदृश होतो ..
मजुरी न मिळणारया आजी आजोबांच्या आसवांनीच ..
ते गार्डन कदाचित एवढे हिरवेगार राहत असेल ...
त्या गार्डन मधील खडा वा काटा असो
कधी त्या आजी आजोबांना त्रास देत नाही ...
कदाचित मुलाचे आणि सुनेचे शब्द टोचून घायाळ झाल्यावरच ..
ते तिथे येऊन बसतात याची जाणीव ठेवत असतील ते ....
पेल्यातला अंधार संपत जात असतो ..
आणि काळीज काळेभोर होत जाते .....
पायांना चढलेल्या दारूने ..
कसा बसा पोहचतो,
जिथे एक शरीर दुसऱ्या शरीराची वाट बघत असते ..
आणि हॉल मध्ये ..
" आई बाबा तुम्ही जेवले का "
हा तरी प्रश्न मुलाने विचारायला यावे ..
या आशेत जागणारया आई वडील ,यांची प्रेमळ मागणी ..
उभी असते बेडरूम च्या दाराजवळ ..
कदाचित सकाळ होई पर्यंत ....
बाकी काही नाही ...
नि:शब्द(देव)