Sunday, May 4, 2014

आजही तो पाऊस...

ओल्या केसांवरून,
एक थेंब ओघळत गालावर आला...
पावसात भिजून नुकतीच ती घरी आली...
ती केसांची लट मी हळूच सरकावली...
ती लाजली आणि बिलगली मला....
म्हणाली चल ना पावसात भिजू...
मी म्हटले नाही ग ...
तू ही डोक पुसून घे आणि कपडे बदल...
ती रुसली...
जा तू पहीले सारखा नाही राहिला...
नि डोळ्यात न येणार्‍या अश्रूला...
कसतरी डोळ्यात आणण्याचा प्रयत्न करून खिडकी जवळ पळत गेली....
मग हळूच तिने खिडकी बाहेर बघीतले....
मी उभा होतो भर पावसात....
ती हसली नि पळत आली...
समोर येऊन एकदम थांबली...
एका श्वासा एवेढ अंतर होत दोघात...
आणी पावसाचे थेंब काही तिच्या ...
तर काही माझ्या ओठांवर....
बिलगली मला ती घट्ट....
खरच डोळ्यात पाणी आले होते तिच्या....
मी तिचा चेहरा हातात घेतला...
काय ग येडु आता का रडते आहेस...
बोट ओठात दाबून...
थोडी नकारार्थी मान हलवली तिने...
खूप दिवसानी तिला..
तिचा तोच देव भेटला होता...
त्या पावसा सारखा...
प्रेमात तिला चिंब ओला करणारा....
पाऊस थांबला होता आता...
पण...

आजही तो पाऊस...

आमच प्रेम जिवंत ठेवून आहे....

निशब्द(देव)

No comments:

Post a Comment