Sunday, May 4, 2014

बंद अलमारीत ... चुरघळलेल्या काही कविता ..
काही गझल ..
काही तिच्यासाठी लिहिलेले पत्र ..
आणि आठवणीच्या घड्या करून ,
त्यात अलवार लपवलेला तिचा फोटो ...
फोटो मागे "I love You" लिहिलेले .. 
आणि खाली पुसटशी सही ..
त्या पुसटश्या सही सारखेच आमचे नाते हि पुसट झालेले ...
कवितांना डांबर गोळीचा सुगंध ...
आणि तिला पहिल्यांदा दिलेला गुलाब
मृत अवस्थेत कवितांच्या मांडीवर ...
कसे तरी समजावून ...मोठ्या कष्टाने एका गझलेचा रुसवा दूर केला ..
मग त्या गझलेने माझ्याशी खूप गप्पा केल्या ..
अर्थात " तुझ्याच " 
तू मला बघितल्यावर ...तुझ्या डोळ्यात अलगद जे अश्रू यायचे ना ...
तसेच गं ..हो अगदी तसेच ...
तुझ्यावर लिहिलेली पहिली कविता
मला बघताच ....तिच्या ही डोळ्यात ...

खूप दिवसांनी ..नाही वर्षांनी ... मला भेटलो ... बोललो ..रडलो ..हसलो ...
खूप गप्पा केल्या कवितेशी गझलेशी ...पत्रांशी मात्र तो फोटो ..... ...
सोड जाऊ दे ...
घडी करून परत कोंबले त्यांना .. त्याच अलमारीत ...
मी पापण्या मिटल्या अन रात्र झाली ...
पापण्या उघडे पर्यंत ... प्रकाशाला दारावरच उभे राहू दे ...
तो एकदा आत आला ..की मी माझा राहत नाही ..
नाते काम जवाबदारी ... बघू ...
पापण्या नाही उघडल्या तरच बरे ... पण नाही ना ...
उघडाव्या लागतीलच ... भेटेल पुन्हा कधी स्वत:ला ..

वेळ द्यावाच लागेल...

No comments:

Post a Comment