वहीवरील जखमा
उलटतांना ...
एका अर्धवट कोर्या पानांवर ..
काही दिवस दिसले घाबरलेले ..
काही शब्द पुसटसे..
आणि माझ्या मनाच्या वाटेवर ..
त्या कागदावरून धावत आल्या , काही आठवांनी ..
काही आठवनीचा गळा शब्दांनीच घोटलेला ..
त्या आठवनींना चूरघळून होडी बनवली ,
आसवांच्या समुद्रात सोडली....... लावारिस ..
तुझ्या होणार्या भासाच्या लाटा ..
आणि त्या होडीवर सवार ..काही घाबरलेले दिवस ...तेच
अर्धवट कोऱ्या पानावरचे ..
एक जखम अजून उलटली ..
"तू जाऊ नकोस... " असे लिहिलेल्या त्या ओळीत
चक्क तू जातांना दिसत होतीस ..
"मी जगू शकणार नाही " या ओळीत
मी कुठेतरी दडून बसलेलो ...
त्या वेळी निघालेली आसवे ..
खाली ओघळून पडलेल्या, त्या सहीवर पडलेली..
आणि आज आलेला एक अश्रू ..
परत त्याच सहीवर ...
कविता त्या जुनाट असतील ... तुझ्या साठी ..
माझ्या साठी ते माझे ..काही दिवस... घाबरलेले ...
आता पुढचे पान ???
गझलेचे असेल कवितेचे कि मुक्त छंदाचे
ठावूक नाही ..
पण ते पलटतांना मात्र
जखमाच पलटतील ...
आणि असतील काही दिवस ..
ना दिवस नाही ...
एक अख्ख आयुष्य घाबरलेले ..
नि:शब्द(देव)

No comments:
Post a Comment