आतल्या आवाजाने
खुपदा ,
ओठांचे दार ठोठावले ...
पण बाहेरून पहारा देत उभा होता स्वार्थ ...
काळजाच्या भिंतीवर आईचा फोटो लावण्या इतपत ,
बायकोने काळीज रिकामे ठेवले नव्हते ....
पण खोल खूप खोल काळजाच्या एक अडगळीची खोली होती ,
तिथे आई सुखात होती ..
चुलींच्या लाकडात बाप दिसायचा आणि तव्यावर आई ,
माझ्यासाठी जळतांना .
कधी कधी पिठलं भाकर खातांना ..
भाकरीचा हात होतो आणि भरवते ती पिठलं मला ,
जशी आई भरवायची ...
जगले असते का अजून काही दिवस तरी ते ?हा प्रश्न
"माझा पगार का वाढला नाही " बायकोने विचारलेल्या
या प्रश्ना समोर गुडघे टेकायचा ..
अपूर्ण इच्छा सकाळी उठल्यावर ,
मागण्यांनी भरलेले गढूळ पाणी अंगावर घेऊन ,
कधीच ज्याचा मान नाही ठेवला अश्या त्या देवा समोर सिगरेट लाऊन ,
उत्त्बत्ती ब्यागेत भरून ओफ्फिs मध्ये साहेबा समोर लावायचो .
पण कुठेतरी ..कधी आभाळ बनून ,कधी कायदा बनून
कधी माझ्या पोरीच्या रुपात ,आई भेटायची ..समजवायची ..
दारू मला पिताना ,आठवणींचा चकणा जेंव्हा अर्धा मेज खाली सांडायचा,
तों उचलतांना डोक्याला लागलेल्या मेज मध्ये बाप असायचाच कुठेतरी ..
हालत डुलत घरी शरीर पोहचल्यावर ..
आतल्या आवाजाने खुपदा ,

बस बाकी काही नाही ...
नि:शब्द(देव)

No comments:
Post a Comment