Sunday, May 4, 2014

आयुष्याचा काडीमोड ....

अजून मनाला पटले नाही ..
तू माझ्या सोबात नाहीस ..
माझी नाहीस ..

उश्याशी अश्रू झोपतांना ,,,,,,
चांदण्यांना बाजूला सारून ,,,,
काळ्याभोर आकाशाचे दु:ख पाहतो...
चंद्र खिडकीतून येतो बोलायला ..
समजवायला ...
पलंगावर जागणाऱ्या आठवणी ..
आणि हृदयात नुकतेच मेलेले प्रेम ...
रात्र जाळून काढतात ...पण

तुझी हाक तर ऐकू येत नाही आता ,,
पण ..
टप टप टप ..
किचन मध्ये गळणारा नळ ...
तू जवळ असल्याचे भासवतो खरे ...पण
अजून ....

पापण्या सुकलेले ढग ..
आणि आवाज करत करत हवा देणारा पंखा ..
त्या घड्याळ्या मागे लपलेली पाल ..
जणू घड्याळ्याचे काटे धरून बसली आहे ..
वेळ जाता जाईना...
जिला पाहून तू कधी मला बिलगून जायचीस ..
आता ती ही सहसा जास्त बाहेर येत नाही ..
ओठ शिवलेल्या भिंतीवर आपला मुका फोटो ..
आणि कपाटात धूळ खात पडलेल्या त्या साड्या..
आरश्याला लावलेली टिकली ..
सार काही तसच आहे ...
बस तुझा आणि माझ आयुष्य बदलय...

आयुष्याचा काडीमोड ....
बस बाकी काही नाही ..

नि:शब्द(देव)

No comments:

Post a Comment