फाटका गणवेश घातला
म्हणून ,
बाईंनी दिलेल्या शिव्या ,
आणि गणिताच्या मास्तरने ,
मारल्या नंतर झालेला त्रास ..
भूगोलाच्या फाटक्या पुस्तकात घडी करून ठेवला ..
माझ्याकडे दयनीय नजरेने बघणाऱ्या ,
इतिहासाच्या मास्तरची नजर ,
डब्बा म्हणून मधल्या सुट्टीत कामा आली ..
माझ्याशी कुणीच का खेळत बोलत नाही? ,
हा मनाला पडलेला प्रश्न .
आई कामावर जाणाऱ्या त्या काकुनी ,
दिलेल्या त्या जुन्या दप्तरात कोंबून ...
थेट पोहचलो तहानलेल्या शेतात ..
जिथे बाप रक्ताने पिक उगवायचा प्रयत्न करीत होता ,
"बाळा चांगला अभ्यास कर " खूप मोठा हो ..जा घरी जा
बोलून लागला तो आपल्या कामाला ..
त्यांनी दिलेली ती प्रोत्साहनाची शिदोरी ..
मगाशी पडलेल्या प्रश्नावर ठेवून ..
घरी परतलो...
मोठा होण्यासाठी जे लागत ,
ते दप्तरात आहे आता माझ्या ..
भूगोलाच्या पुस्तकात,
ठेवलेला त्रास आणि शिव्यांची घडी उघडली ...
अश्या कित्येक गोष्टींच्या घड्या उघडायच्या आहेत अजून ...
आणि उघडेल ..
आणि मोठाही होईल ...
नि:शब्द(देव)

No comments:
Post a Comment