मी दार
ठोठावण्याच्या आधीच कानावर आले ...
" आई तुला काही कळत नाही तू गप्प रहा "
हे एकूण तिची माया अनाथच झाली असेल ...
"तू पोटात असतांना तुला काय हव काय नको ते कळायचं मला "
आणि आता म्हणतोस की मला काही कळत नाही """.
हे शब्द तिच्या ओठातून तर बाहेर पडले नाहीत ..
पण तिने पापणीत रोकून ठेवलेले अश्रू हेच बोलत होते ..
(खिडकीचा पडदा बाजूला सारून बघत होतो तिच्याकडे "
मी पाहिले होते तो(मुलगा ) जन्मल्या पासून ..
तिच्या हृदयात,ओठांवर ,डोळ्यात तोच असायचा ..
त्याचे हट्ट ..त्याच्या चुका ..
ती अलगद पदरात सामावून घ्यायची ...
पण शहराची घरे इतकी छोटी झाली आहेत ,
की आता त्यात आई बाबांना जागा नाही ..
मनात चाललेल्या गोंधळानेच दरवाजा ढकलला समोर .. .
"आलात तुम्ही ...कितीदा बोलले की
आता होत नाही तुमच्याने आराम करा ,पण
माझ्या मेलीच कधी ऐकलत तुम्ही"" ..(तिचा संताप खोकलत होता )
तिच्या जवळ गेलो आणि ..
गजरा दिला तिला ...
तिचे अश्रू लाजलेत ...
मुलाने टाकलेला घाव थोडा वेळ तरी ..
विसरली असेल ना ती ?
आम्ही त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा अपमान ..
सध्या श्वास बनून येतात दोघांचे ...
उद्या परत एक गजरा आणावाच लागेल बहुदा !
नि:शब्द(देव)

No comments:
Post a Comment