माननीय अधिकारी,खासदार आमदार ,मंत्री .....सो ओन......
पत्र लिहिण्यास कारण की ...
वेदनेने नको तेवढे लाड केले ...
रात्र झाली तरी लोड शेडींग होती ,
पण जवळच कुठेतरी एका शेतकऱ्याची..
चिता जळत होती ..
त्या प्रकाशात वाळलेल्या पिकांचे शेत ..
उठून दिसत होते ....
त्याच्या बायकोचा, मुलांच्या रडण्याचा आवाज ...
जाणवून देत होता की अजून ही काही लोक जिवंत आहेत .....
माझ्या बायकोच्या डोळ्यात आलेले काळे ढग ...
अन भर रात्री शेतात उगवलेला सूर्य ....
जाऊ दे मायला ..मुद्द्यावर येतो
पत्र लिहिण्यास कारण की ...
चिता जवळपास जळून राख झाली आहे ...
हाडे विकण्यासाठी दलाल शोधत आहोत ..
आपणास हे काम व्यवस्तीत जमत ..
लवकर येणे करावे ......
................................................................
राज्यात जरी दुष्काळ होता ...
पण पत्र साले ओले होते ,
पत्र लिहिण्यास कारण की ...
वेदनेने नको तेवढे लाड केले ...
रात्र झाली तरी लोड शेडींग होती ,
पण जवळच कुठेतरी एका शेतकऱ्याची..
चिता जळत होती ..
त्या प्रकाशात वाळलेल्या पिकांचे शेत ..
उठून दिसत होते ....
त्याच्या बायकोचा, मुलांच्या रडण्याचा आवाज ...
जाणवून देत होता की अजून ही काही लोक जिवंत आहेत .....
माझ्या बायकोच्या डोळ्यात आलेले काळे ढग ...
अन भर रात्री शेतात उगवलेला सूर्य ....
जाऊ दे मायला ..मुद्द्यावर येतो
पत्र लिहिण्यास कारण की ...
चिता जवळपास जळून राख झाली आहे ...
हाडे विकण्यासाठी दलाल शोधत आहोत ..
आपणास हे काम व्यवस्तीत जमत ..
लवकर येणे करावे ......
................................................................
राज्यात जरी दुष्काळ होता ...
पण पत्र साले ओले होते ,
No comments:
Post a Comment