चांदण्यांना येणारा
पूर पाहून कित्येकदा
काळे ढग पापण्यात कैद करून ठेवले आहे ...
चालताना काटा लागला आणि रक्त सांडले ..
नेमके तिथेच .फक्त तिथेच हिरवी पालवी फुटलेली शेतात ...
आई भाकरी थापत असतांना ...
डोळ्यात आलेले अश्रू ..चुलीच्या धुरा मुळे आहेत ...
असे आई म्हणत जरी असली तरी ..
राब राब राबून आलेल्या बापच्या घामाला
खर काय ते कळून जायचे ......
भावनांच्या दुष्काळात आठवणी पेरून ..
रस्त्यावर खेळणाऱ्या त्या लहान मुलांच्या ..
डोळ्यात सुखांना उगवतांना पाहिलय मी ...
काही अशीच सुखे शब्दांचे पांघरून ओढून ..
कुठल्यातरी पानावर शांत झोपली असतील ...
त्यांना शोधत शोधत ...
आयुष्याची वजाबेरीज बेचव होऊ नये
म्हणून दु:खाला अनाथ होऊ दिले नाही आजवर ..
बस बाकी काही नाही ...
नि:शब्द(देव)
काळे ढग पापण्यात कैद करून ठेवले आहे ...
चालताना काटा लागला आणि रक्त सांडले ..
नेमके तिथेच .फक्त तिथेच हिरवी पालवी फुटलेली शेतात ...
आई भाकरी थापत असतांना ...
डोळ्यात आलेले अश्रू ..चुलीच्या धुरा मुळे आहेत ...
असे आई म्हणत जरी असली तरी ..
राब राब राबून आलेल्या बापच्या घामाला
खर काय ते कळून जायचे ......
भावनांच्या दुष्काळात आठवणी पेरून ..
रस्त्यावर खेळणाऱ्या त्या लहान मुलांच्या ..
डोळ्यात सुखांना उगवतांना पाहिलय मी ...
काही अशीच सुखे शब्दांचे पांघरून ओढून ..
कुठल्यातरी पानावर शांत झोपली असतील ...
त्यांना शोधत शोधत ...
आयुष्याची वजाबेरीज बेचव होऊ नये
म्हणून दु:खाला अनाथ होऊ दिले नाही आजवर ..
बस बाकी काही नाही ...
नि:शब्द(देव)
No comments:
Post a Comment