वयाचे अंशी जन्म,दुष्काळातच गेले ..
आता माझी मुलं आम्हाला ..
"आई बाबा" अशी हाक मारत नाहीत ..
"बिमारी म्हणतात ".....
"पाठीचा कणा आणि स्वाभिमान सोबतच वाकले" ..
"जेंव्हा तुला बोलता ही येत नव्हत
तेंव्हा ही सार कळायचे रे मला.
की काय हवंय काय नकोय तुला ,
आणि आता म्हणतो आई तुला काहीच कळत नाही ..""
बायकोचे हे शब्द कानावर आले ..
डोळ्यातले पाणी,पापण्यांच्या पदरा आड लपवत ,
घराचे दार ढकलून आत गेलो ..
तिचे हे अश्रू दारातच अडवलेले दिसले ..
हसत बोलली आलात ?
हो... (छत्री बाजूला ठेवून )...
आज ही गजरा विसरलो ग ..
''''''
असू देत उद्या आणा आठवणीने ..
(बहुदा अपमानाचा गजरा आज तिने माळला असावा )
मी तरी काय करू , मुद्दाम विसरतो मी तो गजरा ..
यासाठी फक्त की
"मी उद्या गजरा आणेल"...
कमीत कमी या आशेवर तरी ती उद्यापर्यंत जगेल ....
बस बाकी काही नाही ...
नि:शब्द(देव)

No comments:
Post a Comment