भिंतीच्या भांडणात
..
घराचे छप्पर हरवले ...
अंगणात तुळस ..
वाळलेली...
तुळशी जवळ दिवा ..
वांझोटा ...
कुठला तरी दगड ..
अंगणातल्या छोट्या मंदिरात ..
देव बनून बसलेला ...
घरात ..नाही नाही चार भिंतीत ..
तो आणि ती ..
शरीर फक्त त्याचे आणि तिचे ..
प्रेम तिजोरीत जमा ..
दर महिन्याला तिजोरीतच वाढतांना ...
दारावर " शुभ - लाभ "
ते अजून ही वा तरीही दोघे सोबत एवढच शुभ ...
लाभ ..लाभा साठीच तर ही हेळसांड केलीय जगण्याची ...
निशब्द(देव)
घराचे छप्पर हरवले ...
अंगणात तुळस ..
वाळलेली...
तुळशी जवळ दिवा ..
वांझोटा ...
कुठला तरी दगड ..
अंगणातल्या छोट्या मंदिरात ..
देव बनून बसलेला ...
घरात ..नाही नाही चार भिंतीत ..
तो आणि ती ..
शरीर फक्त त्याचे आणि तिचे ..
प्रेम तिजोरीत जमा ..
दर महिन्याला तिजोरीतच वाढतांना ...
दारावर " शुभ - लाभ "
ते अजून ही वा तरीही दोघे सोबत एवढच शुभ ...
लाभ ..लाभा साठीच तर ही हेळसांड केलीय जगण्याची ...
निशब्द(देव)
No comments:
Post a Comment